इयत्ता 10 वी ICT पर्यायी व बहुपर्यायी प्रश्नसंच भाग 2



बोर्डाच्या ICT पेपरमध्ये आलेले पर्यायी व बहुपर्यायी (OBJECTIVES) प्रश्नसंच भाग 2
Download here Objective Questions Set No.2 in PDF

१. एकविसाव्या शतकात उदयाला आलेली जागतिक अर्थव्यवस्था माहितीच्या बळामुळे तंत्रज्ञानाच्या इंधनामुळे आणि ज्ञानामुळे विकसित झाली आहे.

२. गणित आणि विज्ञान शिकवताना ICT चा साधन म्हणून वापर केल्यास अध्ययन अध्यापनाला मदत होईल.

३. शिस्तबद्ध अभ्यासासाठी लागणारी माहिती ई-मेल व न्युजग्रूप आयसीटी साधने वापरून अधिक परिणामकारक रूपाने गोळा करता येते.

४. माहिती तोंडी सादर करण्यापेक्षा दृश्य स्वरूपात सादर केली तर संकल्पना अधिक ती स्पष्ट होतात.

५. जी.यु.आय.(GUI) हे ग्राफिकल युझर इंटरफेस चे संक्षिप्त रूप आहे.

६. ICT मुळे वेगवेगळ्या पद्धतीने माहितीचे विश्लेषण आणि मांडणी करता येते.

७. एखाद्या यंत्रणेची प्रतिकृती तयार करताना अल्गोरिदम आणि सूत्र यांचा वापर करून ती यंत्रणा काम करते.

८. मॉडेलिंग म्हणजे वास्तवातील एखादी यंत्रणा परिस्थिती आभासी स्वरूपात उभी करणे.

९. सॉफ्टवेअरच्या सहाय्याने 
संगणकावर त्रिमिती  प्रतिकृती तयार करणे म्हणजे मॉडेलिंग होय.

१०. हवामानाचा वेध घेणा-या संगणक प्रणालीचा वापर करून संभाव्य वादळाचा अंदाज वर्तवता येतो.

११. संगणक प्रणालीच्या मदतीने वास्तवातील जगाचे रूप उभे करणे म्हणजे सिम्युलेशन.

१२. जगभरातील विक्रेते आणि खरेदीदार मध्यस्थाशिवाय व्यापार व देवाण-घेवाण करतात.

१३. इलेक्ट्रॉनिक डेटा इंटरचेंज हे इ.डी.आय(EDI) चे संक्षिप्त रूप आहे.

१४. VAN म्हणजे Value Added Network (व्हॅल्यू अॅडेड नेटवर्क).

१५. ATM म्हणजे AUTOMATED TELLER MACHINE (ऑटोमेटेड टेलर मशीन)

१६. GPS (GLOBAL POSITIONING SYSTEM) तंत्रज्ञान हा डिजिटल मॅपिंग नॅव्हिगेशन सिस्टिमचा पाया आहे.

१७. फोरमचे अंतर्गत घटक युझर ग्रुप , पोस्ट आहेत.

१८. VOIP चे प्रकार VOIP अॅडॉप्टर्स, VOIP फोन

१९. WWW म्हणजे WORLD WIDE WEB (वल्ड वाईड वेब)

२०. ICT हे INFORMATION & COMMUNICATION TECHNOLOGY चे संक्षिप्त रूप आहे.

२१. इंटरनेट हा माहितीचा महामार्ग आहे.

२२. ज्ञानाधिष्ठित समाज समाज म्हणजे जिथे ज्ञान हे उत्पादनाचे प्रमुख संसाधन आहे असा वर्ग.

२३. मागणी आणि प्रतिसाद या तत्त्वांवर माहिती संप्रेषण तंत्रज्ञान(ICT) काम करते.

२४. माहिती संप्रेषण तंत्रज्ञान(ICT) म्हणजे माहिती प्रसारित करणे, साठवणे, तयार करणे, माहितीचे आदानप्रदान करणे यासाठी वापरण्यात येणारे तंत्रज्ञान.

२५. माहिती संप्रेषण तंत्रज्ञानामुळे माहितीचे आदानप्रदान होते.

२६. माहिती संप्रेषण तंत्रज्ञान हे संगणक तंत्रज्ञान आणि संप्रेषण तंत्रज्ञान यांचे मिश्रण आहे.

२७. माहिती संप्रेषण तंत्रज्ञान हे नाविन्य आणि शिक्षण या दोघांनाही मूर्त स्वरूपात आणणारे साधन असून त्या शिवाय ज्ञानाधिष्ठित समाजाला परिपूर्णता येणार नाही.

२८. एल.सी.डी(LCD) प्रोजेक्टरचा वापर करून अध्यापन परिणामकारक होते व विद्यार्थ्यांना समजण्यास सोपे जाते.

२९. TCP म्हणजे TRANSMISSION CONTROL PROTOCOL (ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल).

३०. ब्लॉग(BLOG) हा शब्द वेब ब्लॉग(WEB BLOG) पासून बनला आहे.

३१. ब्लॉगवर पोस्ट केली जाणारी माहिती व्यक्तिगत ब्लॉगचा वापर करून नियंत्रित करता येते.

३२. ब्लॉग तयार करण्यासाठी आणि पोस्ट करण्यासाठी HTML एडिटर चा वापर होतो.

३३. इतर लोकांबरोबर संवाद साधण्यासाठी, विचाराची देवाणघेवाण करण्यासाठी सहयोग देण्याची इंटरनेट वरील जागा म्हणजे फोरम होय.

३४. फोरम म्हणजे विषय आणि पोस्ट यांचे रचनात्मक मिश्रण व त्यांची विशिष्ट वर्गवारी केलेले सबफोरम.

३५. VOIP टेलीफोनवरील ध्वनीलहरींचे डिजिटल सिग्नलमध्ये रुपांतर करतो व ते सिग्नल्स इंटरनेट द्वारा पाठवले जातात.

३६. टेलीकम्युनिकेशन विशेषतः इंटरनेटद्वारे व्यावसायिक देवाणघेवाण करणे म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉमर्स.

३७. इलेक्ट्रॉनिक कॉमर्स म्हणजे इंटरनेटचा समावेश करून वस्तूंची खरेदी-विक्री, सेवा आणि माहितीची देवाण-घेवाण करणे होय.

GO TO MAIN PAGE

No comments:

Post a Comment